बा. वि. ठोसर - लेख सूची

बरट्रॅंड रसेल, जॉन एकल्स आणि अतीत

या टिपणाचा उद्देश प्रा. रसेल आणि प्रा. एकल्स या सुविख्यात, स्वतःच्या क्षेत्रात उच्च दचि वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेल्या दोन तत्त्वचिंतकांचे अतीताविषयी (transcendence) काय विचार होते हे समजून घेण्याचा आहे. हा लेख वाचण्यासाठी पार्श्वभूमि म्हणून रसेल यांच्या चरित्राचा संक्षिप्त आलेख लक्षात घेणे योग्य होईल. त्यांचे जीवन १८७२ ते १९७० या काळातले म्हणजे १९ व्या शतकाच्या शेवटापासून …

विज्ञानातील व्याधी (Diseases in Science) -प्रा. जॉन एकल्स यांचे काही विचार

. इतकेच नव्हे तर या व्याधींवर करण्याचे उपाय हे कार्ल पॉपर यांच्याच लेखनात व विचारांत मिळू शकतात हे एकल्स यांनी स्पष्ट केले आहे. विज्ञानक्षेत्रातील व्याधींबद्दल प्रा. एकल्स यांचे विचार वाचकांसमोर मांडावे असे वाटल्यावरून हे टिपण लिहिण्यास घेतले. सुरुवातीलाच प्रा. एकल्स यांनी प्रांजळपणे कबूल केले आहे, की त्यांना हे विचार ते स्वतः संशोधनकार्यातून निवृत्त झाल्यावर, मागील …

कार्ल पॉपर आणि जॉन एकल्स यांमधील एक महत्त्वाचा मतभेद – आस्तिकतेविषयी

माझे विज्ञानविषयक तत्त्वज्ञानाचे आकर्षण हे मुख्यतः The Self and Its Brain या कार्ल पॉपर व जॉन एकल्स या उच्च दर्जाच्या दोन विद्वान तज्ज्ञांनी एकत्र मिळून लिहिलेल्या ग्रंथापासून सुरू झाले. कार्ल पॉपर हे अर्वाचीन तत्त्वज्ञान्यांत, विशेषत: विज्ञानविषयक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात, आघाडीवरचे तत्त्वचिंतक म्हणून आता सर्वमान्य झाले आहेत. The Logic of ScientificDiscovery या उद्बोधक ग्रंथाचे ते लेखक आहेत. …

चर्चा -ज्ञानसाधनेचे मार्ग

आ. सु. च्या ऑगस्ट १९९५ च्या अंकात दोन विचारप्रवर्तक लेख ज्ञानसाधनेबद्दल आले आहेत. (१) ‘ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय?’ हा श्री. श्री. गो. काशीकर यांचा व (२) अंतर्ज्ञानाचा पाया भक्कम नाही’ हा डॉ. पु. वि. खांडेकर यांचा. विवेकवादासाठी ही चर्चा व हा विषय यांना फार महत्त्व आहे. ज्ञानसाधनेसाठी वैज्ञानिक रीत अतिा सर्वमान्य झाली आहेच. म्हणून …

चर्चा- भक्ती हे मूल्य आहे काय?

आ. सु. च्या डिसेंबर १९९४ अंकात “भक्ती हे मूल्य आहे काय?” हा प्रा. दि. य. देशपांडे यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे भक्तीला आपल्या देशांत पुरातन कालापासून तो आजवर इतके महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे की यासंबंधी केवळ विवेकवादांतूनच नव्हे तर सर्व दृष्टिकोनांतून सखोल चर्चा होणे हे अगत्याचे आहे. हा लेख वाचल्यावर मनांत आलेले काही विचार, …

अतीतवाद, विवेकवाद व विज्ञान

मे १९९४ च्या आजचा सुधारक च्या अंकात प्रा. मे. पुं. रेगे यांनी सातारा येथील संमेलनात केलेल्या अध्यक्षीय भाषणाच्या संदर्भात प्रा. दि. य. देशपांडे यांचा “अतीत व विवेकवाद” हा व प्रा. प्र. ब. कुळकर्णी यांचा “प्रा. रेग्यांची अतीतवादी मीमांसा’ हे दोन विचारप्रवर्तक लेख आले आहेत. यात प्रा. कुळकर्णी यांनी विज्ञानाविषयी बरीच स्पष्ट विधाने केली आहेत. प्रा. …